आपल खान्देश

कुसुंब्यातील धनगर समाजाकडून राहुल परदेशी यांचा सत्कार.


झूम मराठी समाचार

कुसुंबा ( प्रतिनिधी )- कुसुंबा परदेशी धनगर समाजातर्फे ठाणे- पालघर शिक्षक पतपेढीचे नवनिर्वाचित संचालक राहुल परदेशी यांचा सत्कार समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

ठाणे- पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या निवडणूकीत कुसुंबा येथील मूळ रहिवासी असलेले समाजबांधव राहुल छबिलाल परदेशी हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. राहुल परदेशी यांच्या विजयामुळे कुसुंबा येथे फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला होता. राहुल परदेशी यांचे रविवारी कुसुंबा येथे आगमन झाले असता कुसुंब्यातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले.

त्यानंतर त्यांची राममंदिर चौक ते धनगर समाजभवनापर्यंत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. धनगर समाजभवनात सर्वांचे आगमन झाल्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांसमोर राहुल‌ परदेशी यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला जिल्हा परिषद धुळेचे कृषी सभापती संग्राम आबा पाटील , पंचायत समिती गटनेते रितेश परदेशी यांचेसह धनगर समाज पंच मंडळाचे अध्यक्ष छबिलाल परदेशी, उपाध्यक्ष नारायण परदेशी, सचिव दिपक परदेशी यांचेसह पंच मंडळाचे इतर सदस्य, मल्हारराव‌ होळकर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, पंच मंडळाचे सल्लागार तथा माजी उपसरपंच रामलाल तुळशीराम परदेशी, माजी सरपंच गेंदा नागो परदेशी, संचालक राजेंद्र सूर्यवंशी, गटप्रमुख राजेंद्र परदेशी, केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत परदेशी, प्रकाश परदेशी, सुरेश परदेशी, सुनिल परदेशी, विजय परदेशी, संजय धनगर यांचेसह मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते. ठाणे- पालघर शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीतील आव्हानांबाबत योगेश परदेशी यांनी माहिती दिली. कार्यक्रम सुरू असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते‌ साहेब, माजी सभापती भगवान गर्दे, संजय गांधी योजनेचे माजी अध्यक्ष दरबारसिंग गिरासे, युवा नेते गणेश मधुकर गर्दे यांचे आगमन झाले. मुंबई येथून कार्यक्रमाबाबत माहिती मिळाल्याने धुळे जिल्हा दौ-यावर असताना कुसुंबा येथे राहुल परदेशी यांचा सत्कार करण्यास आवर्जून आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष शेवते व युवा नेते अजित पाटील यांनी दिली. सर्वांच्या उपस्थितीत राहुल परदेशी यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर‌ देताना राहुल परदेशी यांनी समाजबांधवांचे या विजयात मोठे योगदान आहे असे सांगितले व सत्कार केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. अध्यक्षीय भाषणात महादू आबा परदेशी यांनी राहुलसारख्या तरूणांनी समाजसंघटनात समाजाचे नेतृत्व करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल परदेशी यांनी केले तर प्रविण परदेशी यांनी आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे