ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच..! कारवाई नाही..

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

झूम मराठी  

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 50 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. बंडखोरी करणाऱ्या अनेकांवर शिवसेनेनं कारवाईही केली. आता शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, असं वृत्त समोर आलं होतं. मात्र शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच असल्याचं शिवसेनेनं पत्रातून स्पष्ट केलं आहे.

सामना दैनिकातील बातमी अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेना उपनेते म्हणून शिवसेनेतच कार्यरत आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे