महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात अनेक ठिकाणी काल सोमवारी सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. प्रामुख्याने कोकणात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी ठिकाणी सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र जोरदार वारे, ढगांचा गडगडाट, विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून प्रामुख्याने माघारी फिरत असतो मात्र पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून, कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. तर बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दरम्यान, कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता, तर 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उद्या उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढचे दोन दिवस मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना अक्षरशः महापूर आला आहे. अनेक ठिकाणी गावात आणि घरातही पावसाचे पाणी शिरले. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याला तब्बल दोन तास पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे