ब्रेकिंगमहाराष्ट्र
लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, राजेश टोपेंची मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती
मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील.




