आपल खान्देश
नंदुरबार – अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या!
अवकाळी व थंडीमुळे 20 हून अधिक मेंढ्या दगावल्या
झूम मराठी वृत्तसेवा
नंदुरबार : जिल्ह्यात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस, निर्माण झालेले प्रचंड धुके आणि अचानक वाढलेला गारठा यामुळे शेतपिकांची नासाडी झाली आहे. त्याचबरोबर वाढलेल्या गारठ्याने जिल्ह्यात विसहुन अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला.
नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील तलवाडा येथे 4, खर्दे खुर्द येथे 4 आणि मांजरे येथे 15 मेंढ्या मरण पावल्याची घटना घडली आहे. पावसात भिजून व गारठा सहन न झाल्यामुळे मेंढ्या मरण पावल्याने मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घरांचीही झाली पडझड..
अवकाळी पावसामुळे नंदुरबार तालुक्यातील अमळथे गावात तीन घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यात आज पाऊस नसला तरी मोठ्या प्रमाणावर धुके आणि हवेतील गारठ्यामुळे कडाक्याची थंडी असल्याचे वातावरण आहे.




