आपल खान्देश

गुलाबराव देवकर जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पदाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला

जळगाव- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेली निवडणूक जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांची वर्णी लागली आहे. तसेच उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांची निवड झाली आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महा विकास आघाडीने दणदणीत विजय संपादित केला होता. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा समान वाटावा हवा असल्याने गेल्या काही दिवसांपासून बैठका सुरू होत्या. गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थित पदाचा फॉर्मुला निश्चित करण्यात आला होता. २० महिन्यांचा फॉर्म्युला खंडित करीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अध्यक्षपद ठेवले तर उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले.

बैठकीत पदाचा कार्यकाळ आणि पक्ष निश्चित झाले असले तरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याचा सस्पेन्स मात्र कायम होता. शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर यांनी अध्यक्षपदासाठी तर शिवसेनेकडून शामकांत सोनवणे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. दोघांची निवड निश्चित झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे