महाराष्ट्र

रशियाहून अंबरनाथला परतलेल्या 7 वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण

अंबरनाथ : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संपूर्ण जगभरात त्याची दहशत पसरली आहे. या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेले नसले तरी परदेशातून आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

सध्या राज्य सरकारने विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. विशेषतः कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या हवाई प्रवाशांबाबत प्रशासन हाय अलर्टवर आहे. तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातील सात वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबासह परदेशात जाऊन आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सात वर्षीय मुलीचे नमुने ओमिक्रॉन चाचणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच संबंधित मुलगी व तिचे कुटुंबीय सध्या होम क्वारंटाईन झाले असून त्यांची इमारत सील करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेनी दिली आहे.

संबंधित मुलगी ही आपल्या आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परत आलं. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्याने तिची टेस्ट केली असता तिचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. तर मुलीच्या वडिलांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड झालं आहे.

 

दरम्यान, सध्या महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा धोका असल्याचे समजते आहे. राज्यात ओमिक्रॉनचे 28 संशयित रुग्ण असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तीनही शहरं गर्दीची आहेत. यामध्ये मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरांतील आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आले आहेत, तर तिघे जण हे त्यांच्या संपर्कात आले असून या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत त्याचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे