आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांशिवाय भरली शाळा!

विद्यार्थ्यांशिवाय भरली शाळा.

मुंबई (उदय नरे) राज्याती विद्यार्थ्यांशिवाय भरली शाळा ओमिक्राँन व कोरानाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मुंबई महानगर पालिका तसेच ठाणे व नवी मुंबईतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. फक्त दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्याची मुभा ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या भितीने अनेक शााळांमध्ये विद्यार्थीच न आल्याने आज विद्यार्थीविना शाळा भरली आहे असे चित्र दिसत होते. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आँफलाईन शाळा असल्यामुळे शाळा प्रशासनाला शिक्षकांना शाळेत बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता.

शाळा मधील अनेक शिक्षक वसई, विरार, बदलापूर, ठाणे, अंबरनाथ, कल्याण अशा निवासस्थानातून उपनगरात व मुंबई शहरात येत असतात. शाळा मधील उपस्थिती संदर्भात कोणत्याही प्रकारचा उल्लेख नसल्याने शाळेतील शिक्षक संभ्रमित आहे. दहावीच्या वर्गात शिकवणारे शिक्षक हे पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ही शिकवत असतात तर काही शिक्षक केवळ नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात अशा वेळी केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलवायचे की सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थीत राहण्यासाठी अवगत करावे असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला?

शाळेतील सर्व शिक्षकांना उपस्थीत राहण्यासाठी सूचना देऊन शाळेतूनच आँनलाईन वर्ग घेण्यात आले तर काही ठिकाणी शिक्षकांनी आपल्या निवासस्थानातून वर्ग घेण्याची मुभा देण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रक परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे या मुळे अनेक शाळांमध्ये दहावी व बारावीच्या पुर्व परीक्षा आयोजित केल्या आहेत परंतु या परीक्षेत प्रत्यक्ष विद्यार्थी किती उपस्थीत राहतील या संदर्भात शिक्षक वर्ग साशंक आहेत. आभासी म्हणजे आँनलाईन पध्दतीने परीक्षा घेतली तर मुल्यमापन व त्यांच्या सत्यता बद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा या आँफलाईन पध्दतीनेच घेण्यात येणार आहेत कारण आँनलाईन परीक्षा घेण्याइणकी सक्षम यंत्रणा राज्यात नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षक, विद्यार्थी पालक इतकेच काय? तर शिक्षण विभाग व प्रशासनही चिंतेत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे