ब्रेकिंग

अमळनेर नगरपरिषद दिव्यांग निधी संदर्भातील कारवाईचा जिल्हाधिकारी कडून मागितला अहवाल


प्रहार संघटनेच्या तक्रारीने राज्यमंत्री ना.बच्चूकडू यांनी घेतली तात्काळ दखल

प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी कोविड काळात निधी उपलब्ध असतांनाही मुदतीत खर्च न केल्याने वारंवार जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निधी वाटप करण्यात आला होता. परंतु निधी वाटपात कोणतेही निकष लावण्यात आले नसल्याने बोगस लाभार्थींना लाभ देणे व शासन निर्णयाचे उल्लघन झाले असल्याने प्रहार अपंग क्रांती संघटने कडून निधी वाटपावर आक्षेप घेण्यात आला होता या तक्रारींवर जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी यांच्याकडून अहवाल मागितला असता निर्दोष कर्मचारी यांना ज्ञापन देवून जिल्हा प्रशासनाकडून दिव्यांग निधी प्रकरणावर कानडोळा करण्यात आला तसेच संघटनेस नगरविकास विभाग व न्यायालय यांच्याकडे अपील करण्याचा अधिकार असून आपण समुचित प्राधिकरण कडे दाद मागवावी असे पत्र देण्यात आले होते.

  सदरील प्रकरणात दिव्यांगावर अन्याय झाल्याने चुकीचे आदेश अमळनेर नगरपरिषद यांच्याकडून घेण्यात आले असल्याने प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी तसेच राज्य अध्यक्ष बापूराव काणे, उपाध्यक्ष अभय पवार, महासचिव रामदास खोत, सहखजिनदार एड.कविता पवार यांच्या स्वाक्षरीने राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांची मंत्रालयात भेट घेवून या प्रकरणात अमळनेर नगरपरिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर शासन निर्णयानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असल्याने ना.बच्चुभाऊकडू यांनी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांना लेखी आदेश करण्यात आले होते नगरविकास विभागाने दि.२९ नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडून सदरप्रकरणी नियमानुसार तपासणी/कारवाई करून,मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह शासनास सादर करण्यास सांगण्यात आले आहे. शासन निर्णयाचे उल्लंघन करून कोणताही अधिकारी / कर्मचारी यांना नियमानुसार शिक्षा होत नसेल तर नागरिकांनी शासन निर्णयावर विश्वास ठेवावा की नाही असाही प्रश्न मंत्रालयात राज्य कार्यकरणी यांनी उपस्थित केला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे