आपल खान्देश

तेली चौधरी समाजाचे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक संघटनेचे पाचोरा अध्यक्ष पदी संजय त्र्यंबक चौधरी तर उपाध्यक्ष पदी तुषार देविदास चौधरी 

तेली चौधरी समाजाचे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक संघटनेचे पाचोरा अध्यक्ष पदी संजय त्र्यंबक चौधरी तर उपाध्यक्ष पदी तुषार देविदास चौधरी 

पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्र तेली समाज ह्या राज्य स्तरीय तेली सामजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक संघटनेचे पाचोरा तालुका शाखेचे पाचोरा शहर अध्यक्ष म्हणून संजय त्र्यम्बक चौधरी आणि उपाध्यक्ष म्हणून तुषार देविदास चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवनियुक्त अध्यक्ष संजय चौधरी हे पाचोरा तेली समाजाचे वरिष्ठ समाजसेवक असून त्यांच्या रेस्टॉरंट व्यवसाय सांभाळून 20 वर्षांपासून पाचोरा शहर तेली युवक मंडळ पाचोराचे सक्रिय कार्यकर्ते,श्रीराम चौक गणेशोत्सव समिती, दुरगोत्सव मंडळ पदाधिकारी म्हणून बाहेरपुरा, पाचोरा परिसरात सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमात सहभागी होत असतात. ह्या सामाजिक कार्याची दखल घेत पाचोरा तालुका कार्यकारिणीचे अध्यक्ष हेमंत चौधरी आणि तालुका कार्याध्यक्ष, प्रदीप तुळशीराम चौधरी यांच्या शिफारशी नुसार महाराष्ट्र अध्यक्ष, BMTS चे सर्वेसर्वा विलास बबन व्हाव्हळ साहेब,महाराष्ट्र अध्यक्षा महादेवी कोरेताई, महाराष्ट्र कार्याध्यक्षा सुलोचनाताईसाहेब यांच्या नियुक्ती पत्राने वरील दोन्ही पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल महाराष्ट्र राज्य BMTS सचिव प्रशांत चौधरी, जळगाव BMTS जिल्हाध्यक्ष सुनील BR चौधरी, स्थानिक m m महाविद्यालय चतुर्थ कर्मचारी संघटना, स्वरसामर्थ्य संस्था परिवारतर्फे त्यांच्या भावी सामाजिक कार्यास शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे