मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ठाणे जिल्हा तिल कोपरी ठाण्यात हजेरी लावणार
शरण खन्ना
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
ठाणे
दि २६ नोव्हेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह २३४ दिवसांनी मुंबईत परतल्यानंतर त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुुरु झालाय. आज ते चांदीवाल आयोगापुढे हजर राहण्याची शक्यता आहे. चांदिवाल आयोगानेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावलेत. दुसरीकडे खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेले परमबीर सिंह यांची काल तब्बल ७ तास कसून चौकशी करण्यात आली. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे..विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आलाय.. परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरुन सचिन वाझे हे खंडणी गोळा करत होते असा आरोप अग्रवाल यांनी केला होता..दरम्यान परमबीर सिंह चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..परमबीर सिंह यांना गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशीला बोलावण्यात येण्याची शक्यता आहे..
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा