उदय नरे – मुंबई
कोरोनाच्या काळात बंद असलेल्या शाळा टप्प्या – टप्प्यात सुरू झाल्या होत्या. आजच्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.
पहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक ती करोना नियमावली जाहीर करण्यात येईल, असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.
मा.मुख्यमंत्री,मंत्रिमंडळ व पीडियाट्रिक टास्क फोर्स यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने १ डिसेंबरपासून ग्रामीण भागात इ.१ली ते ४थी व शहरी भागात इ.१ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यातील शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असे ट्विट शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा