आपल खान्देश

नांदगाव एसटी कर्मचाऱ्यांचा संप प्रवाशांचे अतोनात हाल


 नांदगाव ( प्रतिनिधी – मुक्ताराम बागुल ) महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीत संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असून माहेरी आलेल्या सुवा शिनींना सासरी परतण्याची घाई असताना संप सुरू झाल्याने पुन्हा काही दिवस माहेरी राहण्याची संधी मिळाली तर काहींना सासरी वेळेवर न जाण्याचे अडचणींना तोंड देण्याची वेळ आली आहे.

 राज्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वच डेपोत राज्यव्यापी संप सुरू करण्यात आला असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील अशी भूमिका आता एसटी महामंडळाच्या कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळणार असल्याचे चित्र निर्माण झाली आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर मराठी माणसावर अन्याय होणार नाही अशी घोषणा केली होती. पात्र मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची असलेली एसटी व एसटी कर्मचारी सध्या अडचणीत आहे. त्यांना तुटपुंजा मानधनात काम करावे लागते. राज्यातील जवळपास 35 एसटी कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केले आहेत. या आत्महत्या थांबवायचे असतील तर राज्य सरकारने तातडीने एस टी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून घ्यावी. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचा संप सुरूच राहील अशी भूमिका आता एसटी महामंडळाच्या कर्मचारी यांनी घेतली असल्याने ऐण दिवाळीच्या प्रवाशांचे हाल होत आहे. दिवाळी भाऊबीज निमित्त माहेरी आलेल्या सुहासिनी सासरी परतण्याचा मार्ग सध्यातरी खोळंबला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून प्रवाशांचे हाल होणार नाही. असे मत प्रवाशांनी व्यक्त केले. तसेच एसटी बंद असल्याने ट्याकशी चालकांनी माणुसकी दाखवली असून अगदी बसला लागणाऱ्या प्रवासी भाड्यात त्यांनी सुविधा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.

( मी दिवाळी आणि भाऊबीज निमित्ताने माहेरी आले होती. आज पासून सुट्ट्या संपल्या आहेत. म्हणून आज पुण्याला जाण्यासाठी बसस्थानकात आले मात्र सात तासापासून थांबूनही बस आणि दूर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने घरी माहेरी परत माघारी फिरावे लागत आहे. माहेरी एखादा दोन दिवस जास्त राहण्याचा आनंद मिळेल पण सासरी जाणे ही गरजेची आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर एसटीच्या मागण्या मान्य कराव्या जेणेकरून सर्वसामान्य माणसांना त्रास होणार नाही. – किरण पटाईत, महिला प्रवासी यांची प्रतिक्रिया )

 राज्य सरकारने इतर महामंडळ राज्य सरकार मध्ये मिलिंद केले तसे एस टी महामंडळ सुद्धा राज्य सरकार मध्ये विलीन करून घ्यावे ही आमची मुख्य मागणी आहे. तसेच आम्हाला अगदी तुटपुंजा पगारात काम करावे लागत आहे. आमच्या जवळपास पस्तीस कर्मचाऱ्यांनी यामुळे आत्महत्या केलेले आहेत. या पगारात आम्ही आमचे कुटुंब चालवू शकत नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे