आपल खान्देश

मंगरूळ ग्रामपंचायतीत चिंधीचोर भ्रष्टाचार.प्रहार संघटनेने माहितीच्या अधिकारातून केले उघड

मंगरूळ ग्रामपंचायतीत चिंधीचोर भ्रष्टाचार.प्रहार संघटनेने माहितीच्या अधिकारातून केले उघड झाला असून त्याची चौकशी व्हावी.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग ५% निधी कधी वाटप झालाच नाही परंतु निधीची सर्रास उधळपट्टी करून बोगस कागदपत्रे बनवून ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट केले जात असल्याबाबत माहितीच्या अधिकारातून केले उघड झाला असून त्याची चौकशी व्हावी.

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत मधील दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधी मिळालाच नसल्याने काही दिव्यांगांनी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांच्याकडे तक्रारी केल्या असल्याने मंगरूळ ग्रामपंचायतीची विभागीय चौकशी व्हावी म्हणून प्रहार अपंग क्रांती संघटनेची जिल्हापरिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा.लोखंडे यांच्यासोबत त्यांच्या दालनात प्रहार संघटनेच्या ४ प्रतिनिधी सोबत बैठक घेण्यात आली असल्याने अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग ५% निधी कधी वाटप झालाच नाही परंतु निधीची सर्रास उधळपट्टी करून बोगस कागदपत्रे बनवून ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट केले जात असल्याबाबत प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर पुराव्यानिशी आणल्याने सदरील ग्रामपंचायतीची विभागीय चौकशी व्हावी म्हणून बैठक घेण्यात आली होती. सदरील बैठकीस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,तालुकाध्यक्ष योगेश पवार, शहराध्यक्ष नूरखान पठाण , पत्रकार जैनुल शेख व ईतर पदाधिकारी सोबत बैठक घेऊन या विषयाची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली असता १५ दिवसात मा.गट विकास अधिकारी यांना तात्काळ आदेश देऊन चौकशी लावण्यात आलीअसून लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल असेही सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे