आपल खान्देश
अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तनाचा सप्ताह
भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अध्यात्मिक आघाडीचा अनोखा उपक्रम पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तनाचा सप्ताह
पाचोरा- येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांचा दिनांक १५ नोव्हेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही तालुक्यांत लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असून,भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या वतीने अमोल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा आणि भडगाव तालुक्यात भव्य किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आज दिनांक ०९ नोव्हेंबर पासून आठवडाभर हा सप्ताह चालणार असून दोघेही तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भव्य किर्तन सप्ताहाचे गाव निहाय नियोजन खालील पद्धतीने असेल

तरी पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांनी तसेच भजनी मंडळ,वारकरी सांप्रदाय आणि किर्तन प्रेमींनी ह्या किर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगावच्या वतीने करण्यात आले आहे.




