जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चा व ओबीसी मोर्चाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारीनां निवेदन सादर
जळगाव जिल्हा राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चाने निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले
निलेश पाटील
समाजाच्या व शेतक-यांच्या हितासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा व राष्ट्रीय पिछडा मोर्चा च्या वतीने संपुर्ण भारतात पाच टप्प्यातील आंदोलन घोषित करण्यात आले आहे. यापैकी आज पहिल्या टप्प्याअंतर्गत जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देण्यात आले.
- ओबीसींची जाती आधारित जनगणना करण्याकरिता.
- तीन काळे कृषी कायदे वापस घेण्याकरिता*
- ईव्हीएम मशीन सोबत जोडलेल्या पेपर ट्रेल मशीन मधून निघणाऱ्या पेपर चे शंभर टक्के मोजणी करण्यात यावी किंवा बॅलेट पेपर द्वारे निवडणुका घेण्यात याव्यात
वरील प्रमुख मागण्यांसाठी आज जळगाव निवासी जिल्हाधिकारी जळगाव यांना राष्ट्रीय किसान मोर्चा तर्फे मा.चंद्रकांतदादा जगदाळे (राज्याध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा),मा.विश्वासराव पाटील (जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा, मा.रमेश बोढरे पाटील(अमळनेर तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा),मा.सुनिलदादा शिंदे(राष्ट्रीय किसान मोर्चा पाचोरा),मा. धनराजआण्णा मोतीराये(जळगाव तालुका अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा)आदिंनी निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय पिछडा (OBC) मोर्चाच्या मागण्यांचे निवेदन मा.विलासराव पाटील (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), मा.राजेंद्र आबा माळी (महाराष्ट्र राज्य सदस्य राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), सुधाकर बडगुजर (खान्देश प्रभारी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), मा.भरतराव जगताप,मा.प्रमिलाताई जगताप, मा.हर्षदाताई जगताप यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी मा.जी.आर.चौधरी(महाराष्ट्र राज्य सदस्य राष्ट्रीय ओबीसी मोर्चा), सुमित्र अहिरे (खान्देश प्रभारी बामसेफ),राजेंद्र खरे (जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा),मा.हारुन मंसुरी(जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय असंघटित कामगार क्षेत्र),मधुकर टोंगळे सो.,प्रा.विकास उंबरकर सर, सुनिल पाटील सो.(छत्रपती क्रांती सेना),मा.शामकांत पाटील सो., सुजित टेमकर सो.,जे.डी.ठाकरे सो.,राजु भाऊ जाधव,आदि उपस्थित होते.



