गुन्हेगारीमहाराष्ट्र

अहमदनगर जिल्हा हादरला ! पित्याने केली 9 वर्षांच्या मुलाची हत्या….

अहमदनगर झूम मराठी टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- पित्याने आपल्या 9 वर्षे वयाच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण करुन त्याची हत्या केल्याची व तो झाडावरुन पडून मृत झाल्याचा बनाव करुन त्याचे दफन केल्याची घटना तालुक्यातील प्रवरासंगम येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन वडिलांवर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 13 ऑक्टोबर 2021 रोजी सागर शंकर पवार (वय 9 वर्षे) या बालकाचा मृत्यू झाल्याची अकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्यूचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने माझ्याकडे तपास देण्यात आला.

सदर अकस्मात मृत्यूच्या चौकशी दरम्यान मृत्यू घडल्याचे घटनास्थळ पंचनामा करुन साक्षीदार राजू फकिरा गाडे (वय 52) रा. टोका-प्रवरासंगम याच्याकडे चौकशी करता त्याने सांगितले की, मी नेवासा नगरपंचायत येथे नोकरीस असून प्रवरासंगमच्या पंपहाऊस येथे ड्युटीवर असताना

तेथे जुन्या डाकबंगल्या शेजारी राहणार्‍या महिला पाण्यासाठी आल्या होत्या. तेथे चर्चा चालू होती की, शंकर पवार याने त्याच्या मुलाचे हातपाय बांधून काठीने मारहाण केली. तो बेशुद्ध पडल्याने त्याला नेवासा येथे रुग्णालयात नेले परंतु तो मयत झाल्याने परत घेऊन येवून परस्पर दफनविधी केला.

त्यानंतर मुलाला दवाखान्यात घेऊन गेलेल्या गाडीचा चालक अनिल वसंत भागवत (वय 23) रा. प्रवरासंगम याच्याकडे चौकशी केली असता मुलगा झाडावरुन पडून जखमी झाल्याने त्याला दवाखान्यात घेवून जायचे असे सांगितल्याने नेवाशाला दवाखान्यात नेले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे