आपल खान्देश

भडाळी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

भडाळी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

नगरदेवळा वार्ताहर:-येथून जवळच असलेल्या भडाळी येथे जिल्हा परिषद च्या माध्यमातून सदस्य श्री.रावसाहेब पाटील यांनी अंगणवाडी शाळेसाठी 8 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून आज त्याचे भूमिपूजन शिवसेना जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

भडाळी येथे नवीन अंगणवाडी बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी रावसाहेब पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब (जिभु)पाटील यांनी त्यासंबंधी पाठपुरावा करून अंगणवाडी साठी 8 लक्ष 50 हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन आज रोजी त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख धर्मराज पाटील,वडगाव नर्मदेश्वराचे येथील सरपंच उपसरपंच,ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक, मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग, भडाळी ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे