आपल खान्देश

स्थानिकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार द्यावा भीम आर्मीची मागणी

 

धुळ्यातील हाडाखेड चेक पोस्ट वरील टिसी रविकुमार अर्जुन पेंढारकर यांची बदली तात्काळ रद्द करा , अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल.

भीम आर्मी राज्य प्रमुख नेते , द्रष्टे स्वाभिमानी समाजरक्षक कर्मयोद्धा मा.प्रफुल्लभाई शेंडे, राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.रामकृष्णअण्णा नेरकर, राज्य प्रवक्ते मा.रमाकांतजी तायडे,धुळे जिल्हाप्रमुख मा.संजुबाबा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार

शिरपूर तालुकाप्रमुख मा.विजयभाऊ मरसाळे यांनी स्थानिक प्रशासनाला दिला सक्त जाहीर इशारा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असणारे महाराष्ट्र बॉर्डर चेकपोस्टचे कंत्राट सदभाव कंपनीचे असून , त्या अंतर्गत येणारे हाडाखेड चेकपोस्ट येथे २०१४ पासुन कार्यरत असणारे एकुन २२ टोल कलेक्टर (TC) कार्यरत आहेत , आणि विशेष म्हणजे ते सर्व स्थानिक आहेत. हाडाखेड चेकनाका सुरू झाला तेव्हापासून ह्याच स्थानिक TC नी आपल्या जीवाची पर्वा न करता , कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसतानाही , अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इमानेइतबारे सुमारे १२ ते १६ तास , कंपनी नियमानुसार आपली सेवा अविरतपणे पुरवली. *कोरोना सारख्या वैश्विक महामारी काळात सुद्धा , बाहेरील TC सेवा देण्यास नकार देत असतानासुद्धा ह्याच स्थानिक TC कर्मचाऱ्यांनी , आपल्या जीवावर उदार होऊन अत्यंत चोखपणे आपली सेवा बजावली.ह्याच्या परिणामस्वरूप काही TC कर्मचाऱ्यांना जीवघेण्या कोरोना सारख्या महामारीशी दोन हात करावे लागले तरी स्थानिक कर्मचाऱ्यांनी अत्यंत तुटपुंज्या पगारात प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले. असे असताना देखील सदभाव कंपनीने मात्र ह्या स्थानिक कर्मचाऱ्यांना शाबासकी देणे दूरच राहिले ,उलटपक्षी ह्याच कर्मचाऱ्यांना बदलीच्या नावाखाली कामातून काढण्याचा कुटील डाव तर रचला नाही ना? कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या प्रामाणिक सेवेचे हे बक्षीस तर नव्हे ना ? असा तिखट सवाल भीम आर्मीचे डॅशिंग मास लिडर आणि दबंग धुळे जिल्हाप्रमुख मा.संजुबाबा चव्हाण यांनी विचारला असून , हा अन्याय सहन करणार नसल्याचा जाहीर इशारा त्यांनी दिला आहे.

  अन्यायग्रस्त २२ TC कर्मचाऱ्यांना त्याच चेकपोस्ट वर कायम करावे* तसेच रविकुमार अर्जुन पेंढारकर (एम्प्लॉय ID नंबर २०१९८५) *ह्या अत्यंत कर्तव्यतत्पर असणाऱ्या स्थानिक TC ची बदली अन्यत्र कुठेही करू नये , ह्या व इतर मागण्यांचे निवेदन धुळे जिल्हाप्रमुख मा.संजुबाबा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर तालुकाप्रमुख मा.विजयभाऊ मरसाळे यांनी B.C.P HEAD हाडाखेड चेकपोस्ट यांना दिले आहे.

                    मा.संजुबाबा चव्हाण आणि मा.विजयभाऊ मरसाळे ह्यांनी संयुक्तपणे प्रशासनाला जाहीर इशारा दिला आहे की , स्थानिक कर्मचाऱ्यांना बदलीच्या नावाखाली हटवण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न भीम आर्मी धुळे युनिट कधीच खपवून घेणार नसून वेळप्रसंगी आम्ही रास्ता रोको आंदोलन करू होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही प्रशासनावरच राहील , असा खणखणीत नि दणदणीत इशारा देण्यात आला आहे.

                   भीम आर्मीचे राज्य प्रमुख नेते , स्वाभिमानी समाजरक्षक कर्मयोद्धा मा.प्रफुल्लभाई शेंडे , राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा.रामकृष्णअण्णा नेरकर आणि राज्यप्रवक्ते मा.रमाकांतभाई तायडे यांचे मार्गदर्शन लाभलेल्या निवेदनावर मा.दिपकजी पवार , मा.मूलचंदभाई शिरसाठ , मा.रविभाऊ पेंढारकर , मा.दिपकजी पाटोळे , मा.कन्हैय्याकुमार पावरा , मा.विजयभाऊ पावरा , मा.सचिनभाऊ पाटील , मा.सांवनभाई पवार , मा.अनिलभाऊ माळी , मा.राकेशभाऊ पाटील , मा.संजुभाऊ लोहार , मा.पारसभाऊ बोरसे , मा.आसारामजी पावरा , मा.रमेशजी बागुल , मा.जुबेरभाई खाटील , मा.तौसिफभाई शेख , मा.संदीपजी पावरा , मा.योगेशभाऊ नेरकर , मा.गोपालरावजी माळी ,मा. स्वप्नीलजी देशमुख , मा.नितेशभाऊ मोरे आणि मा.राहुलभाऊ ठाकरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे