आपल खान्देश

कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी!

 

झूम मराठी चाळीसगाव । पावसाअभावी दरवर्षी टंचाईच्या सावटाखाली राहिलेल्या चाळीसगाव तालुक्याने पावसाचे रौद्ररूप अनुभवले. तब्बल ३२ गावांना पुराचा फटका बसला असून, लहान-मोठ्या ६६१ जनावरांचा मृत्यू झाला. तितूर आणि डोंगरी या नद्यांच्या पात्रात वाढलेले अतिक्रमण, सुशोभीकरणाच्या नावाखाली झालेली बांधकामे, अवैधरीत्या होणारा वाळू उपसा, नालेसफाईकडे दुर्लक्ष आदी कारणांनी चाळीसगाव शहरातील वस्त्या, बाजारपेठा जलमय झाल्या. यानंतर अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. फुटलेल्या पाझर तलावाकडे जाण्यासाठी मोठा रस्ता नसताना चक्क कार्यकर्त्याच्या मोटारसायकलवरुन तीन किलोमीटरचा प्रवास करत आणि चिखल तुडवत अतिवृष्टीने फुटलेल्या बिलदरी पाझर तलावाची जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाहणी केली.

शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाझर तलावाच्या दुरुस्तीला आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीला प्रथम प्राधान्य देण्याचे आश्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे मराठवाड्यातील जळगाव, औरंगाबाद इथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी करत आहेत. शनिवारी सकाळी चाळीसगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांची विचारपूस करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

तलावाची दुरुस्ती करू असं आश्वासन जयंत पाटलांचं

तीन दिवसापूर्वी अचानक झालेल्या अतिवृष्टीने बिलदरी पाझर तलाव ओव्हर फ्लो होऊन फुटलं होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी आज या तलावाची पाहणी केली. यावेळी संबधित अधिकारी उपस्थित होते. पहिल्यांदा या तलावाची दुरुस्ती करू असं आश्वासन जयंत पाटील यांनी यावेळी जनतेला दिले आहे.

बिलदरी पाझर तलाव फुटल्याने जमिनीत अतिरिक्त पाणीसाठा झाल्याने ती पाणथळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकार घेईल अशी भूमिकाही जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. आजूबाजूचा परिसर या पाझर तलावातील पाण्यावर शेती आणि घरगुती वापराच्या पाण्यासाठी अवलंबून होता. स्थानिकांची पाण्याविना कोणतीही गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली जाईल असे ठाम आश्वासनही जयंत पाटील यांनी इथल्या नागरिकांना दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे