क्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंग
भारताचं ऑलिम्पिक पदक खातं उघडलं; मीराबाई चानू ने पटकावलं सिल्व्हर
टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताचे पहिले पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजन गटातील महिलांच्या ‘वेटलिफ्टिंग’मध्ये दमदार कामगिरी केली. मीराबाई चानूने स्नैच आणि क्लीन एंड जर्क या दोन राउंडमध्ये एकूण 202 किलो वजन उचलले आणि रौप्य पदक जिंकले आहे. मीराबाई चानू हिने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकाची 21 वर्षांची प्रतीक्षा संपविली. चानूने स्नैच राउंडमध्ये 87 किलो तर एंड जर्कमध्ये 115 किलो वजन असे एकूण २०२ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टिंगमधील ही दुसरी वेळ आहे जेव्हा भारताने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. यापूर्वी कर्नाम मल्लेश्वरीने 2000 साली सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते. तसेच ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताने प्रथमच पदक जिंकले आहे.
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021


