पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाडे येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणी, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन!
आमच्या कष्टाचा पैसा आम्हास मिळावा असे म्हणत शेतकरी मेटकुटी आले आहेत तरी राज्य शासनाने त्यांना मदत म्हणून काही निधी द्यावा असा टाहो फोडत तब्बल 50 शेतकरी आंदोलन करीत आहेत
झूम मराठी वृत्त
पाचोरा तालुक्यातील वाडी शेवाडे येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहॆ त्यांना त्यांची भरपाई मिळावी व फसवणूक करणाऱ्या व्यापारी व इतर ५ आरोपीवर यांच्यावर त्वरीत आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आम्हाला आमच्या कापसाचे कष्टाचे पैसे शेतकऱ्याना मिळावे यासाठी बेमुदत धरणे आंदोलन 17 मे पासून 50 शेतकरीचा आणि पाचोरा जागृत मंचचे पदाधिकारी ही त्यांना पाठीब्यासाठी आंदोलनात सहभागी झालेत.

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, शेतकरी हतबल झालेत त्यांची मदत करणे शासनाचे कर्तव्य आहॆ शेतकरी ताठ मनाने जगायला हवा..
पाचोरा तालुक्यातील वाडे शेवाळे येथील शेतकऱ्यांनी नेहमीच्या व्यापारीला कापूस विकला. तो कापूस विकून, पैसे घेऊन गावातून पसार झाला. तीन महिने झाले. कापसाचे पैसे देत नाही, आणि सापडत ही नाही. शेतकऱ्यांची फसवणूक अश्या भामट्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांची भरपाई मिळावी. आम्ही आमच्या स्थानिक आमदार किशोर पाटील यांना भेटून आपली व्यथा मांडली पण काही उपयोग झालाच नाही. कुठली मदत झाली नाही.
आम्हा गोरगरीब शेतकऱ्यांचा संयमाचा अंत पाहू नये सदरील कापूस विक्रीतून आम्हाला गेल्या वर्षाच्या हंगामातील व्यापाऱ्यांची दे द्यावयाची आहेत. चालू हंगामासाठी शेतीची मगाशत करायची आहे. कुणाला आपल्या मुला-मुलीचे लग्न उरकायचे आहे, कुणाला आपल्या मुला-मुलींचा शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. तर विकास सोसायट्यांचे व बँकांची जुनी कर्ज देऊन नविन घ्यावयाची आहेत. अशा या गुंतागुतीच्या कामी शासन व प्रशासनाने आम्हा शेतकन्यांना मानवतेच्या दृष्टीने शक्य तो सर्व मदत करावी व आमच्या कष्टाचा पैसा आम्हास मिळावा असे म्हणत शेतकरी मेटकुटी आले आहेत तरी राज्य शासनाने त्यांना मदत म्हणून काही निधी द्यावा असा टाहो फोडत तब्बल 50 शेतकरीचे वाडी शेवाडे गावात बेमुदत धरणे आंदोलन 17 मे पासून सुरु आहॆ.




