धुळ्यात श्रावणाच्या पहिल्या आठवड्यात सर्पमित्रांनी दिले,२ भल्या मोठ्या अजगरांना जीवनदान..
सर्पानां सुरक्षित रेसक्यू करून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सुरक्षित अधिवासात सोडून दिले
- दिलीप जय परदेशी
धुळे शहरात सर्पमित्रांनी दोन अजगराला जीवनदान दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे, धुळे शहरालगत असलेल्या मोराणे शिवारातील एक अजगर व नाकाने तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्या लगतच्या पाण्याच्या टाकीत एक भला मोठा सर्प पडलेला दिसून आला त्यांना सुरक्षित रेसक्यू करून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप सुरक्षित अधिवासात सोडून दिले.
येथे पहा सविस्तर व्हिडीओ
धुळे शहरालगत असलेल्या मोराणे शिवारातील रहिवासी विजय पाटील, ह्यांना आपल्या शेतात वावरात असतांना एक भलामोठा सर्प वेतुळा करून बसलेल्या अवस्थेत आढळून आला व त्यांनी वेळेचा अपव्यय न करता सर्पमित्रांना कोल केला. अवघ्या १० मिनिटात सर्पमित्र वेदांत बहाळकर, दुर्गेश जाधव, हर्षल फुलपगारे व सहाय्यक सर्पमित्र संदीप कोळी, विशाल कांबळे, मुकेश शिंपी, विकास पवार घटनास्थळी पोहोचले व शोधमोहिमे नंतर सदर सर्प भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथॉन) प्रजाती चा असल्याचे सर्पमित्रांना दिसून आले.
सर्पाला कुठल्या ही प्रकारची इजा न पोहोचवता सुखरुप रित्या रेसक्यू करण्यात आले. वन विभागाच्या साहाय्याने सदर सर्पाच्या नैसर्गिक आदिवासाचा विचार करत त्याला, संजोरी कुरणात निसर्गमुक्त करण्यात आले.
दुसरा सर्प धुळ्यात १२/८/२४ रोजी, दूपारी:- ३:४५च्या सुमारास धुळे शहरातील नाकाने तलाव परिसरात असलेल्या प्रियदर्शनी जिमखान्या लगतच्या पाण्याच्या टाकीत एक भला मोठा सर्प पडलेला दिसून आला व स्थळावर उपस्थित राकेश भोसले यांनी त्वरित सर्पमित्रांना संपर्क साधला, १०/१५ मिनिटात सर्पमित्र दुर्गेश जाधव, हर्षल फुलपागरे ,संदीप कोळी ,वेदांत बहाळकर,विशाल कांबळे.
घटनास्थळी पोहोचले व तपासणी केल्या नंतर तब्बल ८फुटाचा भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथोन)सर्प फारच प्रतिकूल परिस्थितीत दिसून आला, अवघ्या ३०मिनिटांच्या प्रयत्ना नंतर सर्पाला सुखरूप रित्या वाचवण्यात सर्पमित्रांना यश मिळाला. सदर सर्पाला वन विभागच्या सहाय्याने लळिंग कुरणात सुखरूपरित्या निसर्गमुक्त करण्यात आले.
भारतीय अजगर (पाइथन मोलुरस) ही एक विशाल सापाची प्रजाती आहे जी भारतीय उपखंडात आढळते. ही पाइथनची एक प्रजाती आहे जो त्याच्या विशाल आकारासाठी ओळखला जातो, आपल्या नैसर्गिक अधिवासात २३/२४ फूट लांब असू शकतो. भारतीय अजगराचे शरीर तपकिरी व खडकाळ रंगाचे असते, ज्यावर गडद धब्बे किंवा पट्टे असतात. हा साप मुख्यत्वे त्याचा आकाराप्रमाणे इतर पशू पक्ष्यांचे भक्षण करतो. भारतीय अजगर हा सर्प वन्यजीव आदिनियम कायदा १९७२, च्या प्रथम श्रेणी मध्ये आरक्षित असून ह्याला मारणे दंडणीय गुन्हा आहे.
कुठला ही सर्प व वन्यजीव अडचणीत अढळल्यास त्याला इजा न पोहोचवता जवळील प्राणिमित्रांना किव्हा वन विभागला संपर्क साधावा. अशी माहिती सर्पमित्र वेदांत बहाळकर सर्पमित्र दुर्गेश जाधव ह्यांनी दिली.





