आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

पारोळा येथील एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत प्रो जयश्री वर्मा यांनी संशोधक निबंधाचे सादरीकरण केले

पारोळा | उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि किसान महाविद्यालय पारोळा आयोजित शैक्षणिक उपक्रम म्हणजेच ‘एक दिवशीय राज्यस्तरीय परिषदे’ची आयोजन करण्यात आले होते,  त्यात पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा जयश्री वर्मा वाघ यांचा शोध निबंध सादर करण्यात आला असून एका चर्चेचा विषय मांडून लक्ष वेधले आहे. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि किसान महाविद्यालय पारोळा महाविद्यालयात शैक्षणिक उपक्रम एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेत मान्यवरांच्या उपस्थितीत  संपन्न झाला, या परिषदेत 200 प्राध्यापक आणि संशोधकांनी नोंदणी केली तर जवळपास दीडशे शोधनिबंध प्राप्त झाले. यामध्ये यामध्ये श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ जयश्री वर्मा वाघ यांनी संशोधक विद्यार्थिनी म्हणून संशोधक निबंधाचे सादरीकरण व मनोगतिय अभिप्राय केले. तसेच प्राचार्य डॉ. जी एच सोनवणे यांनी शाश्वत विकासातून पर्यावरण संरक्षणासाठी समाजाच्या गरजा संतुलित करण्यासाठी मार्गदर्शन केले.

राज्यस्तरीय परिषदेत अनिर्बंध औद्योगीकरण, शहरीकरण आणि जंगलतोड यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे नुकसान न करता आर्थिक वाढ साधने, प्रदूषण कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि सौर उपकरणाचा वापर वाढवने हा आहे. आजच्या शिक्षकांची भूमिका दीपस्तंभ सारखी असून सामाजिक विवेकशीलता हाच शाश्वत आर्थिक विकासासाठी अविष्कार असल्याचे मत उमवि येथील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ सुरेखा पालवे यांनी मांडले. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अंतर्गत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि किसान महाविद्यालय पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने मानवता आणि पर्यावरण: शाश्वत विकासासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन या विषयावर आयोजित एकदिवशीय आंतरविद्या शासकीय परिषदेच्या उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वाय व्ही पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधिसभा सदस्य प्रा.डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ भूपेंद्र केसुर, प्रा. डॉ विकास गीते, बीजभाषक म्हणून पुणे येथील राष्ट्रीय रसायन शाळा शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे