आपल खान्देश

चाळीसगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील हिंदू स्मशानभूमीसाठीची १ एकर जागा त्वरित पारित करावी अन्यथा..!


चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील मालेगाव- धुळे रोड चौफुली महाराणा प्रताप चौकाच्या मागे , के. आर. कोतकर कॉलेज जुन्या कॅन्टीनच्या बाजूला सर्वे नंबर ४२५/क मधील १.१७ हे. आर (पावणे तीन एकर) विविध समाजासाठी स्मशान भूमी करिता नगरपालिकेने मंजूर केलेली आहे. या संदर्भात दिनांक १२/०७/१९९१ रोजीचा ठराव क्रं ११२३- १ एकर – हिंदू स्मशान भूमीसाठी मंजूर असूनही अंत्यसंस्कारासाठी होत असलेली पायपट थांबेल का?  असा प्रश्न उपस्थितीत केला.

चाळीसगाव नगरपालिका हद्दीतील रेल्वे पलीकडील धुळे रोड, मालेगाव रोड, करगाव रोड स्थित पंचशील नगर, जुना मालेगाव रोड नाका, शिव कॉलनी, पोस्टल कॉलनी, नवलेवाडी, आदर्श नगर, श्रीकृष्ण कॉलनी, प्रभू रामचंद्र नगर, डेराबर्डी परिसर परिसर, वामन नगर, शंभो नगर परिसरात ५० ते ६० हजार हिंदू समाज बांधवांची लोकसंख्या आहे. सद्यस्थितीत इतक्या मोठ्या लोकसंख्येला अंत्यसंस्कारासाठी घाट रोड वर, नदीला लागून असलेल्या चरण पेट्रोल पंपा समोर समोरील स्मशानभूमीत ४ ते ५ कि मी किलोमीटर दूर, रेल्वे पूल ओलांडून जावे लागत आहे. 

हिंदू स्मशानभूमीची जागा 33 वर्षापासून अंत्यसंस्कारासाठी जनतेसाठी खुली केलेली नाही . तसेच तशी जागा मागणी आत्तापर्यंत झालेली नव्हती. या संदर्भात संदीप लांडगे यांनी 10 मे 2023, रोजी हिंदू स्मशानभूमी साठी जागा मागणीचा अर्ज प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केला होता. आजपर्यंत या सर्व पाठपुरावाला 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे .तरी सततच्या पाठपुरावामुळे, भूसंपादन विभाग, जळगाव यांची परवानगी 17 जानेवारी 2024 रोजी प्राप्त झाली. सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा अहवाल 8 फेब्रुवारी 2024 रोजी प्रांत अधिकाऱ्यांना मिळाला आहे.नगर रचना विभाग, जळगाव यांच्या विभागाचा वस्तुनिष्ठ अहवाल आणि तांत्रिक छाननी पूर्ण झालेली असून असे पत्र 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रांताधिकारी यांना प्राप्त झाले.  

प्रांताधिकारी यांनी उप -अधीक्षक भूमि अभिलेख चाळीसगाव यांना 20 फेब्रुवारी 2024 रोजी एक एकर जागेची मोजणी करून दिशादर्शक मोजणी नकाशा व वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आणि जागा मोजणी अहवाल रोजी सादर केला आहे. प्रांत अधिकारी यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी मुख्याधिकारी यांना हिंदू स्मशानभूमीसाठीचे क्षेत्र 0.40 हेक्टर आर वरून 0.19 हेक्टर आर करण्यात आलेले आहे. सदरचे क्षेत्र कोणत्या कारणास्तव कमी करण्यात आलेले आहे याबाबत सविस्तर खुलासा मागवण्यात आलेला आहे.

हा अहवाल सप्टेंबर 2025 पासून प्रलंबित आहे.असे असताना मुख्याधिकारी आणि नगररचना अभियंता गेल्या पाच महिन्यापासून अहवाल देण्यास जाणीवपूर्व टाळाटाळ करत आहे. त्यामुळे हिंदू स्मशानभूमी मंजूर होण्यास विलंब होत आहे. तरी मुख्याधिकारी चाळीसगाव यांनी अहवाल त्वरित पाठवून कायदेशीर पूर्तता करावी. जेणेकरून हिंदू समाजाच्या लोकांच्या स्मशानभूमीकरिता जागा उपलब्ध होईल. अंत्यसंस्कारासाठी होत असलेली पायपट थांबेल. या प्रकरणाची तात्काळ गंभीरतेने दखल घेऊन अहवाल पाठवावा. अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल. होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे, जळगाव शहराध्यक्ष प्रमोद डोंगरे, अमळनेर तालुका अध्यक्ष विनोद पवार, चाळीसगाव शहर अध्यक्ष युवक आघाडी अधिकार पाटोळे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे