ब्रेकिंग

अवैध मुरूम वाहतूक तात्काळ थांबवा राष्ट्रीय जनमंच पक्षाचे जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन..

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) धुळे रेल्वे लाईनला लागून करगाव रोडजवळ उभारण्यात येत असलेल्या मालवाहतुकीच्या रेल्वे धक्क्यासाठी मोठ्या प्रमाणात मुरूमाची गरज भासतेय. साईराम JV नावाच्या कंपनीने हे काम हाती घेतले असून, फक्त 500 ब्रास मुरूम वाहतुकीची अधिकृत परवानगी असताना, अवैधरित्या 3000 ब्रासपेक्षा अधिक मुरूम जागेवर पडलेला आहे—हा सरळसरळ महसूल बुडवण्याचा शॉकिंग प्रकार आहे.

रॉयल्टी म्हणून केवळ तीन लाख रुपये भरलेले असताना प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा मुरूम करगाव शिवारातून चोरीने काढला जातोय. उत्खनन डोन-दिगर दाखवून वास्तवात करगाव परिसरातूनच मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाहेर नेला जातोय. 

दररोज रात्री 12 ते पहाटे 5 या काळात 10 ते 12 डंपर बेधडकपणे धावत असतात. गौण खनिज वाहतुकीवरील कायदेशीर बंदीचा उघडपणे भंग होतोय, आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रांत कार्यालय आणि RTO विभाग पूर्णपणे डोळेझाक करत आहेत. करगाव रोडचे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्रो-रात्रो अवैध वाहतूक सुरू असून, प्रशासन मूकदर्शक बनले आहे. वारंवार तक्रारी करूनही महसूल, पोलीस किंवा RTO एकाही यंत्रणेने दखल घेतलेली नाही.  ही निष्क्रियता संशयास्पद आहे, संगनमताचा वास येतो आणि सरकारी यंत्रणांची प्रतिष्ठा प्रश्नचिन्हात येते.

तात्काळ मागण्या :

  • संबंधित सर्कल व तलाठी यांना तात्काळ निलंबित करावे,
  • बुडवलेला करोडो रुपयांचा मुरूम महसूल – तलाठी, सर्कल, ठेकेदार व कंपनीकडून वसूल करावा.
  • करगाव शिवारातील अवैध उत्खननावर तात्काळ संयुक्त कारवाई (महसूल, पोलीस, RTO) करावी,
  • अवैध वाहतूक होत असलेल्या डंपरवर त्वरित जप्तीची मोहीम राबवावी.
  • संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी – कोण अधिकारी संरक्षण देत आहेत त्याची सखोल चौकशी करावी.

महसूल प्रशासन, प्रांत, पोलीस व आरटीओ विभागाने याकडे दुर्लक्ष केले, तर राष्ट्रीय जनमंच पक्षाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा पक्षामार्फत देण्यात आला आहे.  निवेदनावर प्रदेश सचिव संदीप लांडगे, प्रदेश संघटक देविदास वाघ जिल्हाध्यक्ष देविदास हटकर, जळगाव शहराध्यक्ष प्रमुख डोंगरे आदींच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे