ब्रेकिंग

नागपुर मधील आदिवेशनात युगपुरुष व. सा.का. नवनिर्माण समितीच्या मागणीचा मोर्चा, शेतकरी व कामगार हितार्थ सर्वतोपरी मदतीची ग्वाही!*

नागपूर | हिवाळी आदिवेशन दरम्यान युगपुरुष व. सा. का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीचा नागपूर मोर्चाने लक्ष वेधले असतांना सर्वपक्षीय आमदारांसह सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व त्यांच्या ओ.एस.डी.शी सखोल चर्चा व शेतकरी व कामगार हितार्थ सर्वतोपरी मदतीची ग्वाही देण्यात आली.

खान्देशातील शेतकरी व कामगार हितार्थ साठी युगपुरुष व. सा.का.नवनिर्माण (पुनरुज्जीवन) चा लढा गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाल्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यात जळगावच्या खासदार स्मिता वाघ,  आमदार अमोल चिमणराव पाटील, पाचोरा – भडगांवचे आमदार किशोर आप्पा पाटील, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, माजी मंत्री सतिष आण्णा पाटील, मा.आमदार महेंद्र बापू पाटील, जळगांव लोकसभा उमेदवार व विरोधी पक्ष नेते करणदादा पवार, पाचोरा विरोधी पक्ष नेते अमोलभाऊ शिंदे व पारोळा – एरंडोल व पाचोरा – भडगांव विधानसभेच्या सत्ताधारी व विरोधी पक्ष नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेवून,चर्चा करुन, निवेदन दिले. होतेनागपूर येथील यशवंत स्टेडियमवर आपले पारोळा – एरंडोल विधानसभेचे व युगपुरुष व.सा.का. कार्यक्षेत्राचे स्थानिक आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी मोर्चास्थळी यशवंत स्टेडियमवर येवून युगपुरुष व.सा.का.नवनिर्माण(पुनरुज्जीवन) समितीशी सखोल चर्चा करून,एकुण विषय समजावून घेवून,सोबत काही अनमोल अशा सुचना करुन युगपुरुष व.सा.का.नवनिर्माण(पुनरुज्जीवन) चा लढा चार पाऊले पुढे नेला व जळगांव जिल्हासह युगपुरुष व.सा.का.कार्यक्षेत्रात नवीन आशावाद प्रत्यक्षात जीवंत केला गेला.

नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर काही मोर्चेकरी बांधवांनी कायदा हातात घेतल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण होवून मुख्य द्वार बंद केले गेले होते. परिणामी भरपूर वेळ झाला. शेवटी पोलीस अधिकारीशी चर्चा होवून मधला मार्ग काढून सरळ  ५ सदस्यीय शिष्टमंडळ सहकार मंत्री महोदयांच्या भेटीसाठी मंत्रालयात पोलिसांनी नेले.

संबंधित अधिकारी विजय पाटील यांनी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळाला भेटून, सखोल चर्चा झाली व त्यांनी देखील आम्हाला आपल्या युगपुरुष व.सा.का.चे थकहमीचे काम लवकरात लवकर व्हावे यासाठी काही अनमोल मार्गदर्शन करुन सुचना केल्याने मार्ग सुकर झाल्याचे दिसत आहे. 

सदरील आंदोलन यशस्वी होण्यासाठी ज्या शेतकरी व कामगार बांधवांनी अहोरात्र परिश्रम घेतले व समितीला प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष वेळोवेळी मदत केली त्या सर्वांचे युगपुरुष व सा. का. नवनिर्माण (पुनरुज्जीवन) समितीच्या वतीने निळकंठ प्रल्हाद पाटील यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे