चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय जनमंच पक्षात सामान्य कुटुंबातून आलेले उमेदवाराला संधी देणार

नविन होतकरू, लढाऊ, चेहरे राजकारणात येऊच नये इथे पिढ्यान पिढ्या आपली घराणेशाहीच राहिली पाहिजे यासाठी राजकारणी मंडळी निवडणुक पैशाशिवाय नाहीच असे नरेटिव्ह पसरवून आपला उद्देश यशस्वी करण्यासाठी एक लॉबीच राजकारणात सक्रिय काम करीत असून याला फाटा देत राष्ट्रीय जनमंच पक्षात सामान्य कुटुंबातून आलेले उमेदवाराला संधी देणार आहे.
चाळीसगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे सर्व इच्छुक उमेदवारांना एक नम्र आवाहन करण्यात आले आहे असे की राष्ट्रीय जनमंच पक्ष हा समतेसाठी संघर्ष करणारा, तळागाळातील समाजाला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा पक्ष आहे. भांडवलशाहीचे पोषण करणाऱ्या आणि जनतेचा विश्वास गमावलेल्या प्रस्थापित पक्षांपासून लोक आता वैतागले आहेत.
ज्यांना समाजसेवेची खरी आणि प्रामाणिक इच्छा आहे, जे तळागाळातील सामान्य कुटुंबातून आलेले आहेत, अशा उमेदवारांना राष्ट्रीय जनमंच पक्ष निश्चितपणे संधी देईल आणि त्यांना विजयी करण्यासाठी पक्ष पूर्ण ताकदीने काम करेल. “निवडणूक लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पैसेच लागतात” हा जो गैरसमज आहे, तो राष्ट्रीय जनमंच पक्ष मोडून काढण्याचा निर्धार करून मैदानात उतरला आहे. सामाजिक न्याय, प्रामाणिकता आणि जनतेच्या विकासाची जाणीव असलेले सर्व इच्छुक कार्यकर्ते आणि नागरिकांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी केले आहे



