जळगाव जिल्हा करोना मुक्त, एकही रूग्ण नाही
दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनातून मुक्त झाला आहे.
झूम मराठी
जळगाव : आज आपला जळगाव जिल्हा दोन वर्षे आणि सात दिवसानंतर कोरोनातून मुक्त झाला आहे. २०२० मध्ये आढळला होता पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पेशंट आढळून आले होते तर विशेष करून दुसऱ्या लाटेत मृत्यूंची संख्यादेखील लक्षणीय होती. दरम्यान, लसीकरण झाल्यामुळे जिल्ह्यास तिसऱ्या लाटेचा फटका बसला नाही. काही दिवसांपासून जिल्ह्यात खूप कमी रुग्ण आढळून येत आहेत. तर आज जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या रिपोर्टनुसार आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण उरलेला नाही.

प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आज एकही रुग्ण आढळून आलेला नाही. तर चार रूग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाचा एकही सक्रीय पेशंट उरलेला नाही. यामुळे दोन वर्षे आणि सात दिवसानंतर जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे कालच जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यातील निर्बंध उठविले आहेत.


