Pachora News | पाचोऱ्याच्या डॉली पेंढारकर Dolly Pendharkar Accident यांच्या अपघाती मृत्यूने पाचोरा तालुक्यात हळहळ…
- झूम मराठी ऑनलाईन
पाचोरा (बहेरपुरा) शहरातील बांधकाम साहित्य पुरवठादार आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर इंद्रदेव पेंढारकर यांच्या कन्या डॉ. स्नेहल प्रीतम रावते (Dolly Pendharkar Accident) यांचे सोमवारी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ दुर्दैवी अपघातात निधन झाले.
पाचोरा येथील किशोर इंद्रदेव पेंढारकर यांची कन्या डॉ. स्नेहल (डॉली किशोर पेंढारकर) यांचे लग्न चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील प्रीतम प्रमोद रावते यांच्याशी झाले होते.
प्रीतम रावते अभियंता आहेत आणि सध्या लंडनमध्ये राहतात, तर डॉ. स्नेहल यांनी वैद्यकीय क्षेत्रात एम. डी. शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. डॉ. स्नेहल यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरू केली होती. डॉ. स्नेहल सोमवारी तिच्या वडिलांसोबत लंडनला जाण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठी भुसावळला गेल्या होत्या. पासपोर्टचे काम पूर्ण केल्यानंतर, बाप लेक दोघेही पाचोरा येथील त्यांच्या घरी येण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघाले होते.
परतीच्या प्रवासाला येतांना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावाजवळ मागून येणार्या मोठ्या वाहनाने जबर धडक दिल्याने दोन्ही बाप लेक धडकेत जबर जखमी झाल्याने डाॅ.स्नेहल ह्यांचे दुर्दैवी निधन झाले तर वडील कीशोर पेंढारकर यांनाही डोक्याला,पायाला,तोंडावर जबर मार लागला मात्र ते बालंबाल बचावले, डाॅ.स्नेहल यांच्या लंडन येथील नवीन प्रवासाची स्वप्ने सुरु असतांनाच काळाने झडप घातली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि सर्व स्वप्नांचं चक्काचूर झाला. अपघाताची वार्ता वार्यासाखी पसरली,पाचोरा,जामनेर आणि पहुर येथील नातेवाईक आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचल्यानंतर मदतकार्य करण्यात आले.
मयत डाॅ. स्नेहल यांच्यावर मंगळवारी पाचोरा शोकाकुल वातावरणात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. धडक देऊन पसार झालेल्या वाहन चालकाचा कसुन शोध घेऊन त्या माणुस्कीला काळीमा फासणाऱ्या चालक विरोधात नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.



