महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी सक्तीला विरोध, राज ठाकरेंच्या आदेशाची चाळीसगावात अंमलबजावणी..
चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात दिलेल्या पत्राची आज चाळीसगावात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील महत्त्वाच्या शाळांना भेट देऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली आणि हिंदी शिकवण्यास विरोध करण्यासंदर्भात निवेदन दिले.
चाळीसगाव मनसेच्या शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनांना ही निवेदने सादर केली. इयत्ता पहिलीपासून तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच, असा राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश असल्याचे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले.
यावेळी मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा. यावेळी मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा. चाळीसगाव शहरातील हिरूभाई हीमाभाई पाटील प्राथमिक विद्यालय, व्ही.एस.पटेल विद्यालय चाळीसगा वप्रमुख शाळांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी चाळीसगावचे मनसैनिक यावेळी मनसे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले, मनविसे तालुकाध्यक्ष दिलीप शेरे उपस्थित होते, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे.



