राज ठाकरेंच्या आदेशाची पाचोऱ्यात अंमलबजावनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी सक्तीला विरोध..
मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा, अशी चर्चा करून पत्रक देण्यात आले
- झूम मराठी ऑनलाईन
पाचोरा (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात दिलेल्या पत्राची आज पाचोऱ्यात तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. मनसेच्या शिष्टमंडळाने शहरातील महत्त्वाच्या शाळांना भेट देऊन मुख्याध्यापकांशी चर्चा केली आणि हिंदी शिकवण्यास विरोध करण्यासंदर्भात निवेदन दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाअध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शाळा व्यवस्थापनांना ही निवेदने सादर केली. इयत्ता पहिलीपासून तिसरीपर्यंत सक्तीची भाषा म्हणून “हिंदी” नकोच, असा राज ठाकरेंचा स्पष्ट आदेश असल्याचे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले.
यावेळी मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा. यावेळी मनसेने शिक्षक आणि पालकवर्गाला देखील आवाहन केले की, मराठी माणूस म्हणून त्यांनी या हिंदी सक्तीला मनसे सोबतच विरोध करावा. आदर्श विद्यामंदिर, सुपडू भादू पाटील हायस्कूल, शिंदे इंटरनॅशनल, निर्मल इंटरनॅशनल, पी के शिंदे हायस्कूल, जय किरण न्यू इंग्लिश मीडियम हायस्कूल, बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल यांसह शहरातील प्रमुख शाळांना हे निवेदन देण्यात आले.
यावेळी अनिल भाऊ वाघ जिल्हाध्यक्ष मनसे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभम अशोक पाटील जिल्हा सरचिटणीस, ज्ञानेश्वर ठाकरे तालुकाध्यक्ष, ऋषिकेश भोई शहराध्यक्ष, जितेंद्र नाईक तालुका सरचिटणीस, निलेश मराठे विद्यार्थी शहराध्यक्ष, वाल्मीक जगताप, चेतन मोरे मनसैनिक उपस्थित होतेमहाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे शिक्षण क्षेत्रात आणि पालकांमध्ये याबाबत चर्चाना सुरुवात झाली आहे.



