ब्रेकिंग

पाचोरा भडगाव सह हे तालुके अतिवृष्टी पूरआपत्ती बाधित म्हणून घोषित..

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील मागील महिन्यात अतिवृष्टी झाली होती यात शेतकऱ्यांच्या शेती नष्ट झाल्या गावात पूर आल्याने अनेकांचे संसार उघडे पडले होते राज्य सरकारने पाचोरा भडगावसह एरंडोल , पारोळा, धरणगाव, चोपडा, जामनेर, जळगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, यावल हे दहा तालुके अतिवृष्टी पूरआपत्ती बाधित म्हणून घोषित केले.

राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rainfall) आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित करून विशेष मदत पॅकेज व सवलती जाहीर केल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २९ जिल्ह्यांमधील २५३ तालुक्यांतील बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा हा निर्णय घेण्यात आला. या शासन निर्णयाद्वारे मदतीचे निकष, सवलती आणि बाधित तालुक्यांची यादी अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे