आपल खान्देशराजकीय

पाचोरा भडगाव निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत ठाकरे गट शिवसेना पक्षाची नव्याने मोट बांधणार..

पाचोरा भडगाव तालुक्यातील वैशाली सूर्यवंशी यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्याने शिवसेना ठाकरे गटाचा जळगाव जिल्हास्थरीय पदाधिकारी  यांची महत्त्वाची बैठक निष्ठावंत शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थितीत सपन्न झाली.

जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला पाचोरा भाडगाव तालुक्यात मोठा फटका बसल्याने पुन्हा शिवसैनिकांची ताकद वाढवन्या साठी जिल्ह्यातील उपनेते गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत निष्ठावंत शिवसैनिकांना संवाद साधत पुन्हा सामान्य शिवसेनेची ताकद काय असते ती विरोधकांना दाखवून द्या अशी डरकाडी फोडत शिवसेना ठाकरे गटाला सोडून जाणाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला चर्चेत सामान्य शिवसैनिक चांगलाच आक्रमक दिसत होता. ताई तुम्हाला विधानसभा निवडणुकीत आम्ही किती मदत केली आता आमची निवडणूक येत आहे आणी तुम्ही कुशाल पक्षातंर करून आम्हाला वाऱ्यावर सोडले, अशी संतप्त भावना बोलून दाखवली, मात्र विसरू नका रावणा जवळ सोन्याची लंका होती मात्र विजय वनवासी रामाचाच झाला, कौरवांचा बाजूने सर्वात धनुर्धर कर्ण, ज्याला ब्रम्हाने वरदान दिले असे भिष्म पितामह, सर्व ज्ञानी, विद्वान ऋषीमुनी असतांना विजय अर्जुनाचा झाला, इतिहासात औरगंजेबाकडे लाखो सैन्य होते पण विजय छत्रपती शिवाजी महाराजांच झाला हे प्रसंग तुमच्या आणि आमच्या डोळ्यासमोर आहे हे विसरून चालणार नाही हा इशारा समजा का भविष्याची लढाई समजा…

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलेले दिपक पाटील, कोठली हे बैठकीला उपस्थित होताच शिवसैनिकांनी टाळ्यानीं त्यांचे स्वागत करून व मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या, आमची कंपनीच्या मालकाशी नाही, मातोश्रींच्या मालकाशी बाधिल आहोत.. तुम्हाला कागद सोडून बोलता येत नाही तरी तुम्हाला स्विकारलं याचं कारण फक्त तात्यासाहेब, आणि त्या तात्यासाहेबांचा विचाराला तिलांजली देत आपण पक्ष सोडला..! अशी टीका करत साधला निशाणा..

बैठकीला शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख कुलभूषण पाटील, दिपक राजपूत, युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, उपजिल्हाप्रमुख प्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, याच्या सह भडगाव शहर व तालुक्यात असंख्य शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे