श्री गणेश भक्तीला नवा रंग – शिंदे फार्मसी उजळले “ऑपरेशन सिंदूर” थीमने…
झूम डिजिटल न्यूज | दिलीप परदेशी
पाचोरा (Pachora) तालुक्यातील गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च महाविद्यालयात यावर्षी गणेश चतुर्थी निमित्त गणपती स्थापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पाची “ऑपरेशन सिंदूर थीम आगळीवेगळी साकारण्यात आली असून लक्षवेधी ठरत आहे.
गिरणाई शिक्षण संस्था संचलित शिंदे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च महाविद्यालयात ह्या वर्षी आता नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याची कौशल्य व देशाप्रती असलेले प्रेम व पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला असा एक देखावा साकारले आहे त्यात श्री विराजमान झाले आहेत. हा देखावा साकारण्यासाठी विद्यार्थी व प्राध्यापकांनी मेहनत घेतली असून देखावा देशाच्या “ऑपरेशन सिंदूर” या मोहिमेचा भाग म्हणून विशिष्ट आकर्षण ठरत आहे.
गणेश चतुर्थी पूर्व प्राचार्य डॉ. मनोज दिलीप पाटील यांनी गणरायाला व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मिरवणूक काढली त्यामध्ये विद्यार्थी व प्राध्यापक रुंद ढोल ताशा वरती थिरकले. संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे यांनी गणरायाची स्थापना केली संस्थेचे सेक्रेटरी जे.डी. काटकर, सहसचिव शिवाजी शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष नीरज मुनोत व शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.



