आपल खान्देशब्रेकिंग

जळगाव जिल्ह्यात पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरवले..!

वरील इमेज AI आहे

पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले माणुसकीला लाजवणारी ही घटना जळगावच्या चोपडा तालुक्यातील उनपदेव – अडावद या गावादरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवल्याची  बाब समोर आली असून घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होतांना दिसत आहे.

सविस्तर चोपडा तालुक्यातील उनपदेव – अडावद  येथील बादल राजाराम बारेला (रा. उनपदेव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी पाचवीत शिकत होता १९ ऑगस्टला रोजी सकाळी बसमध्ये शाळेत जाण्यासाठी निघाला परंतु त्याच्याकडील मासिक पास १७ ऑगस्टला संपली होती,  चोपडा बसने शाळेत जाण्यासाठी निघाला. परंतु त्याच्याकडील मासिक पास १७ ऑगस्टला संपली होत,  बस  वाहकाने त्याला तिकिटाविषयी विचारले असता. पास संपल्याचे त्याने सांगितले. यावर वाहकाने त्याला अपशब्द वापरले आणि एका ठिकाणी थांबवून भरपावसात खाली उतरवले. पावसात भिजत हा विद्यार्थी दोन ते तीन किमी पायी चालून उनपदेवनजीक पाड्यावर आपल्या घरी परतला.

वाहकाने शाळकरी मुलाला भरपावसात बेजबाबदारपणे उतरवले घडल्याची बाब समोर येताच घटनेविषयी कर्जाणे येथील उपसरपंच प्रमोद बारेला आणि बिरसा ब्रिगेड सातपुडाचे अध्यक्ष रामदास पावरा यांनी चोपडा येथील आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे