जैन धर्माचा पर्युषण पर्वाचे पाचोरा शहरातील जैन स्थानकांमध्ये सांगता
जैन धर्मातील पर्युषण पर्युपवास (परी+उपवास) म्हणजे एका ठिकाणी तिष्ठासह आपल्या आत्म्यात वास करणे किंवा लीन होणे. परीपासन (परी+उपासना) म्हणजे उत्कृष्ट उपासना म्हणजे आत्म-पूजा. अशा प्रकारे प्रत्येक दृष्टीकोनातून पर्युषण हा आत्मनिरीक्षण, आत्मपरिकक्ष आत्मजागरण, आत्मशुद्धी आणि आत्मप्राप्तीचे महान आहे.
जैन धर्माचा पर्युषण पर्व अहिंसा, दया इत्यादी आत्मगुणांचे पोषण करणारे आहेत. या पावन, पवित्र पर्वाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील रहिवासी दिलीप चोपडा (जैन) यांची सुकन्या कु. वैष्णवी चोपडा (जैन) हिने दिनांक २० ऑगस्ट २०२५ बुधवारपासून अन्नत्याग करत उपवासाला सुरुवात केली असून दिनांक २७ ऑगस्ट २०२५ बुधवार रोजी पाचोरा येथील जैन स्थानकांमध्ये सांगता करण्यात येणार आहे.
जैन धर्माचा पर्युषण पर्व संपूर्ण जगात हे एकमेव पर्व असे आहे ज्यामध्ये माणूस आत्ममुखी होतो आणि अलौकिक आणि आध्यात्मिक आनंदाच्या शिखरावर चढून मोक्षप्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. थोडक्यात काय तर हे पर्व आत्म्याच्या पूजेचे पर्व आहे. खरे तर पर्युषण ही अशी पहाट आहे, जी एखाद्याला झोपेतून उठवते आणि जागृत अवस्थेत घेऊन जाते. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे पर्व म्हणजे पर्युषण. तपश्चर्या, दान/सेवा, नामजप, अध्यात्म, आत्म साधना आणि धार्मिक अध्ययन करून स्वतःला आत्म्याच्या जवळ आणणे आणि मनाच्या खिडक्या/ दारे उघडून माणसांना जोडण्या बरोबर मान हृदयाला बदलून आपले जीवन सार्थक बनवणे.
धार्मिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून जनमनाला प्रबोधन करण्याकरिता पर्युषण पर्व असते. आपली ही भूमी विविध धर्माची जननी आहे व धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध असून प्रत्येक धर्माचा पुर्वकाल निश्चित आहे. आपल्याला पर्वकाळात ते आपल्या इष्ट देवतांची आराधना, पूजा विशेष रुपाने करतात. हे करत असताना बहुतेक धर्मात उत्तम कपडे घालणे, मिष्टान्न खाणे, मौज मजा करणे आदि इंद्रियांचे पोषण करणाऱ्या क्रियेने पर्वाचे समापन केले जाते.



