महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी शिक्षक प्रकोष्ठ विभागातून संघटनात्मक नियुक्त्या, खान्देशातून धुळ्याच्या रितेश परदेशी यांची नियुक्ती

खान्देश टुडे | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर फेरबदलांचा धडाका कायम ठेवला आहे. केंद्रीय पातळीवर नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा केल्यानंतर आता महाराष्ट्र भाजपनेही विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी आणि सहप्रभारींच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यात शिक्षक प्रकोष्ठ विभागातून संघटनात्मक नियुक्त्या खान्देशातून धुळ्याच्या रितेश परदेशी यांची सह संयोजक म्हणून नियुक्ती झाली आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ही यादी जाहीर केली. पदवीधर प्रकोष्ठ आणि शिक्षक प्रकोष्ठ यादी जाहिर केल्या असून, पदवीधर, शिक्षक प्रकोष्ठचे प्रभारी सुनील लोढा यांनी शिक्षक प्रकोष्ठ संयोजक व सह संयोजक त्यांच्यावर जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, त्यात खान्देश मधून धुळ्याच्या रितेश परदेशी यांनाही नवीन जबाबदारी मिळाली आहे. रितेश परदेशी हे धुळे पंचायत समितीचे सदस्य असून भाजपला काळातील पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.
या नियुक्त्यांमध्ये पक्षातील अनुभवी नेत्यांसोबत आमदार, प्रदेश पदाधिकारी आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी काळातील पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हा फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.


