भाजपाच्या वतीने आज राजमाता आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन
पाचोऱ्यात आज भाजपाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन भडगाव रोडवरील महालपुरे कार्यालय येथे दुपारी दोन वाजे दरम्यान करण्यात आले असून उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोककल्याणकारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद मोडून काढला. मानवतावादी द़ृष्टिकोन त्यांनी सदैव आचरणात आणला. आज अहिल्यादेवी यांची 300 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने पाचोऱ्यात भाजपाच्या वतीने जाहीर व्याखानाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात जनता सुखी-समाधानी आणि समृद्ध होती. अहिल्यादेवी चाणाक्ष आणि चतुर राज्यकर्त्या होत्या. नात्यागोत्याचे व्यवहार आणि राजकारण त्यांनी कधीच केले नाही. जाट, भिल्ल, रामोशी या जमातींचा उपयोग त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी करून घेतला. गोरगरिबांची काळजी त्या घेत होत्या. संस्थानातील प्रजेला जाण्या-येण्यासाठी संस्थान खर्चातून रस्ते तयार केले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश त्यांनी रयतेला दिला. चिंचवड, चिखलदरा, रामेश्वर वृंदावन, पंढरपूर येथे त्यांनी अन्नछत्रे उभारली. अनेक तीर्थस्थळे आणि मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला आहे. काशी, वाराणसी, पंढरपूर येथे त्यांनी अन्नछत्रे आणि धर्मशाळा बांधल्या आहेत. जयंतीनिमित्ताने त्यांच्या या कार्याचा आणि विचारांचा जागर व्हावा हीच अपेक्षा ठेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे.



