आपल खान्देश

भाजपा भडगाव व कजगाव मंडळाच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यान

भडगाव – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी भडगाव व कजगाव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आज, शुक्रवार दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ६.०० वाजता भडगाव येथे भव्य जाहीर व्याख्यानाचे तसेच जीवनचरित्रावर आधारित चित्रप्रदर्शनीच्या उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजी महाराज सभागृह (डोकोरे हॉल), दत्तनगर, बाळद रोड, भडगाव येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, यामध्ये जिल्ह्यातील नामवंत वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष मा. डॉ. राधेश्यामजी चौधरी आणि शिवव्याख्याते मा. रविंद्र पाटील (पाचोरा) यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभणार आहे.

या खास प्रसंगी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा भाजप प्रवेशाबद्दल विशेष स्वागत समारंभही होणार आहे कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपा कजगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील व भाजपा भडगाव मंडलाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्यासह संपूर्ण कार्यकर्ते व स्थानिक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. 

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला, युवक, अभ्यासक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी कार्याची नव्या पिढीला ओळख पटेल, तसेच त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श समाजात रुजेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

हा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम असल्यानं भडगाव शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांस्कृतिक वारशाचा गौरव करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आज सायंकाळी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे