आपल खान्देश

पाचोऱ्यात समता सैनिक दलाच्या संपर्क कार्यालयाचे लोकार्पण…

सामाजिक समतेसाठी सतत झगडणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांसाठी हा एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण मानला गेला..

 

  • पाचोरा | दिलीप जय परदेशी

पाचोरा (प्रतिनिधी) भारतीय संविधान व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रखरतेने जपणूक करणाऱ्या आणि सामाजिक समतेसाठी सतत लढा देणाऱ्या समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका आणि जिल्हास्तरावरील कार्यकर्त्यांसाठी पाचोरा तालुक्यात समता सैनिक दलाचे अधिकृत तालुका कार्यालयाचा लोकार्पण एक ऐतिहासिक आणि आनंददायी क्षण मानला गेला.

समता सैनिक दल  एक ऐतिहासिक चळवळ असून जळगाव जिल्ह्यातील सर्व पुरोगामी, समतेचे कार्यकर्ते, चळवळीत झिजलेले कार्यदूत, पत्रकार बांधव आणि समता सैनिक दलाच्या विचारांनी प्रेरित असंख्य लोकांनी हे कार्यालय असावे ही अनेक दिवसांपासून मागणी होती. आता ती मागणी पूर्ण होऊन एक नवा अध्याय सुरू होत आहे.

समता सैनिक दल हे संघटन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्याचा उद्देश सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे, त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्यांप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे. आजही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रांमध्ये असमानता, जातीभेद, अन्याय अशा गोष्टी दिसून येतात. अशा वेळी समता सैनिक दलाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरते.” असे विचार राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी व्यक्त केले. 

समता सैनिक दलाचे राज्य संघटक आयु.विजय निकम यांनी, पाचोरा तालुक्यात गेल्या काही वर्षांत दलाच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम, संविधान जागर मोहिमा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम, तरुण कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे. असे मत व्यक्त केले. त्याच बरोबर समता सैनिक दलाचे आंबेडकरी मिशन बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

  • कार्यालय उदघाटन कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी क्षण.

या उद्घाटन कार्यक्रमात फुले-शाहू-आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते, शिक्षक,प्रबोधनकार, लेखक, पत्रकार, विद्यार्थी, महिलाप्रतिनिधी सहभागी झाले होते. 

हे कार्यालय उद्धाटन केवळ वास्तूचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची, नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे. दलाचे विचार हे केवळ भाषणांपुरते किंवा पोस्टरपुरते न राहता, ते गावागावात, पाड्यापाड्यांत पोहोचावेत, यासाठी या कार्यालयाचा उपयोग प्रशिक्षण केंद्र, संवाद मंच, माहिती केंद्र, तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र, लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष  किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले.

उदघाटन सोहळ्यासाठी सांडू भावराव कॅप्लेक्स परिसरात मोठी तयारी करण्यात आली होती. बॅनर, पोस्टर, फलक, बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाहतूक नियोजन, स्वागत समिती, आभार प्रदर्शन, नविन सैनिकांचा सन्मान असे सर्व कार्यक्रम ठरवून नियोजनबद्ध पद्धतीने आखण्यात आले होते. समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव अरुण खरे व पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे व कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण आयोजन आपल्या खांद्यावर घेतले होते. सर्व घटकांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, पाचोरा शहर व तालुक्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. विशेषतः ग्रामीण भागातील युवक, शेतकरी संघटना, बहुजन संघटना, युवक मंडळे आणि विविध शाळा-शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला.

यावेळी जळगाव जिल्हा सचिव अरुण खरे, अजय संसारे, विक्की ब्राह्मणे, अशपाक शेख, शांताराम गायकवाड दिलीप पवार, चंद्रकांत सोनवणे, प्रवीण सावळे, शांताराम सोनवणे, श्याम ब्राह्मणे, भैय्या गायकवाड निलेश सपकाळे, अँड. ईश्वर जाधव, अनिल ब्राह्मणे, सुनील ब्राह्मणे, दीपक भिल आणि पदाधिकारी उपस्थित होते.


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे