आपल खान्देश

Pachora | पत्रकाराचा असाही प्रामाणिकपणा, सापडलेला मोबाईल मूळ मालकाकडे केला सुपूर्द..

पाचोरा रस्त्यावर पडलेलं मोबाईल पाचोऱ्यातील पत्रकारांच्या प्रामाणिकपणे मुळ मालाकाल परत केलंय. जावेद शेख नावाच्या पत्रकाराच्या या कृतीचं सध्या समाज माध्यमातून कौतुक करण्यात येतंय.

सध्याच्या काळात लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही असं सहज बोलता बोलता बोललं जातं. परंतु, आजच्या जमान्यातही काही लोकांमध्ये हा प्रामाणिकपणा टीकून आहे. याचा प्रत्येय पाचोरा शहरातील पत्रकार जावेद शेख यांच्या कृतीतून दिसून आलाय. शेख जावेद पत्रकार व लक्ष्मण आबा सूर्यवंशी पत्रकार आपल्या खाजगी कामा निमित्ताने प्रवीण सोडा जवळ जात असतांना तेथे त्यांना अंदाजित १५ ते २० हजार किमंतीचा मोबाईल सापडला, तदनंतर जावीद शेख यांनी तो मोबाईल आपल्या जवळ घेऊन लगेच पाचोरा पोलीस स्टेशन गाठले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक  दिनेश भदाणे  व पीएसआय  प्रकाश चव्हाणके यांच्या ताब्यात दिला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी त्या मोबाईलवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आमचा मोबाईल हरवला आहे त्यांना साहेबांनी सांगितले.  लागलीच ती सदर व्यक्ती पोलीस स्टेशनला आली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पीएसआय प्रकाश चव्हाणके साहेब यांनी हा मोबाईल खरोखर त्याचा आहे का याची खात्री करणे करता त्यांची माहिती घेतली तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा व कशा कलरचा आहे त्यांनी सांगितले त्या वर्णन प्रमाणे हा तोच मोबाईल आहे याची खात्री करून तो मोबाईल हरवलेल्या व्यक्तीच्या ताब्यात दिला यावेळी त्या व्यक्तीने जावीद शेख यांचे आभार मानले.

तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे साहेब  प्रकाश चव्हाणके साहेब यांचेही आभार मानले यावेळी पिंपळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दीपक पाटील समीर पाटील हे उपस्थित होते हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाला त्याबद्दल त्याने पत्रकार जावीद शेख व यांचे विशेष आभार मानले आजही पत्रकारांमध्ये माणुसकीचे दर्शन घडवून आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे