आपल खान्देशब्रेकिंग

चाळीसगावमध्ये मिरचीच्या मार्केटला भीषण आग..!

पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात..

चाळीसगाव शहरामधील मिरची बाजाराला भीषण आग लागल्याची घटना शुक्रवार (दि.11) रोजी दुपारी लागली. या भीषण आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. आग लागलेल्या घटनेच्या शेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. चाळीसगाव शहरातील नागद रोडरील मिरची बाजार आहे. मिरची बाजाराला शुक्रवार (दि.11) रोजी दुपारी भीषण आग लागली.

मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीसह इतर शेतमालाचा साठा करण्यात आलेला आहे. मात्र सर्व साठा आगीत सापड्याने जळून खाक झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून या आगीत 12 दुकानांसह एक मालट्रक व दुचाकी जळून खाक झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत सुरु आहे.

अधिकची माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवर मिरची बाजार आहे. या मिरची बाजाराला आज दुपारी भीषण आग लागली. मिरची बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची आणि इतर शेतमालाचा साठा होता. जो या आगीत जळून खाक झाला असण्याची शक्यता आहे. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच या आगीत एक ट्रक देखील जळून खाक झाला असल्याची माहिती समोर आलीय. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 दरम्यान आग लागलेल्या घटनाशेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात एकच धावपळ उडाली आहे. अग्निशामक दलाचे जवान आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत सुरु आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत करत आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे