आपल खान्देशक्रिडा व मनोरंजन

नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटमध्ये इनोव्हेटर्स संघ पाचोरा विजयी..

नयन सूर्यवंशी ठरला सामनावीर

  • दिलीप जय परदेशी

रॉयल ग्रुप तर्फे तीन दिवसीय नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंटच्या चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पाचोरा इनोव्हेटर्स संघाने चमकदार कामगिरी करत देशमुख रायडर्स क्रिकेट पाचोरा संघाचा ३ धावांनी पराभव करत अंतिम स्पर्धेचे विजेतेपद पटकवले.

भडगाव येथे रॉयल ग्रुप तर्फे तीन दिवसीय नाईट क्रिकेट टर्फ टुर्नामेंट आयोजित करण्यात आली होती. या टुर्नामेंट मध्ये जिल्ह्यातील बारा क्रिकेट संघानी भाग घेतला होता. चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पाचोरा इनोव्हेटर्स संघाने अंतिम सामन्यात देशमुख रायडर्स क्रिकेट पाचोरा संघाचा ३ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इनोव्हेटर्स संघाला ११,००० रोख रक्कम,  विजयी चषकाने सन्मानित करण्यात आले.

  • अंतिम सामन्यात नयन लक्ष्मण सूर्यवंशी हा खेळाडू सामनावीर ठरला.

इनोव्हेटर्स संघाकडून प्रशांत देवरे, महेंद्र पाटील, कुलदीप पाटील, नयन सूर्यवंशी, आयुष पटवारी, चेतन चित्ते, विशाल पाटील, देवा परदेशी, जयेश पाटील व शुभम कदम यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. विजयी संघाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे