आपल खान्देशब्रेकिंगमहाराष्ट्र

पाचोरा शहराच्या हिवरा नदिवरील नवगज्या पुलाला पडले भगदाड..!

  • दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरातील नवगज्यावर पुलावरील रस्त्याच्या मधोमध काँक्रीट निघून लोखंड बाहेर आल्याने पुलाला भगदाड पडण्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावरून वाहनांची सतत वर्दळ असते; पडलेल्या भगदाडामुळे या मार्गावरील प्रवास धोकादायक (dangerous travelling) ठरण्याची शक्यता आहे. 

पाचोरा शहरातील हिवरा नदीवरील नवगज्यावर भगदाड पडले असून. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. चाळीसगाव भडगाव पाचोरा मार्गे जळगाव जाण्यासाठी महामार्गावरील वाहतूक जलदगतीने व्हावी, यासाठी पाच वर्षा पूर्वी हा महामार्ग रुंदीकरण, कॉक्रीटीकरण करत असतांना  हिवरा नदीवर नवगज्या पूल नव्याने उभारला होता. मात्र काही वर्षा पूर्वीच बनलेल्या पुलाला जर भगदाड पडत असेल तर झालेल्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी ज्या ठिकाणी रस्त्यावर भगदाड पडले आहे ते ताबडतोब बुजून त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करून देण्यात यावा. तसेच भविष्यात पूल ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले जाणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागा कडून घेण्यात यावी, तसेच प्रशासनाने सदर पुलाचा स्ट्रक्चर ऑडिटची मागणी देखील स्थानिक नागरिकांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे