आपल खान्देश

लोहाराच्या जे जे पंडित विद्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  • झूम मराठी ऑनलाईन

लोहारा (दिलीप राजपूत) धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे जी पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख केवळ भारतात नव्हे तर जगाच्या पाठीवर आहे. भारतासारख्या जगातील दुसऱ्या सर्वात मोठ्या देशाला जगातील सर्वात मोठी आणि आदर्श राज्यघटना ज्या महामानवाने दिली त्या महामानवाच्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासून अनेक संकटे आ वासून उभी होती मात्र त्या प्रत्येक संकटांना तोंड देत, त्यावर मात करत बाबासाहेब आंबेडकर वाट चालत राहिले. आपल्या सबंध आयुष्यात त्यांनी देशासाठी प्रचंड मोठे योगदान दिले. आणि म्हणूनच त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी आणि सर्वच समाज घटकांसाठी प्रेरणादायी आहे.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक डी बी पाटील सर होते याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ यु डी शेळके मॅडम पर्यवेक्षक पी एम सुर्वे सर तर पालकांमधून मनोज भाऊ सरोदे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक यांच्या हस्ते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाय पी वानखेडे सर यांनी केले त्यांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याविषयी माहिती दिली यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक धार्मिक शैक्षणिक कार्यावर मनोगते सादर केली शिक्षकांमधून पी यू खरे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक जीवनाविषयी मांडले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर गीत सादर केले व्ही बी इंगळे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता सादर केली आर के सुरवाडे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मौलिक विचार माडून गीत सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डी बी पाटील सरांनी आपल्या भाषणातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक सुधारणा विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक के के बारी सर यांनी केले जे पी तायडे सर यांनीआभार मानले या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे