आपल खान्देश

Jalgaon | अखेर किशोर सोनवणे यांचे उपोषण सुटले,

बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी समिती स्थापन..

 

जळगाव जिल्ह्यात विविध संस्थेने बोगस भरती केल्याच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून भ्रष्टाचार न्यू्ज चे संपादक किशोर अरुण सोनवणे हे चार दिवसा पासून अमरण उपोषणास बसले होते, त्यांच्या मागणी बघता बोगस शिक्षक भरतीच्या चौकशीसाठी समिती स्थापन करून सदर उपोषण सोडण्यात आले.

पत्रकार किशोर अरुण सोनवणे हे चार दिवसा पासून जळगाव जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळेत केलेल्या बोगस बॅक डेट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीची आणि वेतन अधीक्षक कार्यालयातील बोगस बॅक डेट फरकबील काढून घेणे याबाबतच्या चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याच्या, शिक्षण खात्यातील कर्मचारी यांच्या बदली करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसले होते.

शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी त्यान्ची उपोषणस्थळी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती. परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही आणि चौकशी समिती स्थापन करत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं किशोर सोनवणे यांनी ठणकावून सांगितलं होतं. यामुळे जळगाव शिक्षण खात्याची चांगलीच पळापळ झाल्याचे दिसून आले, त्यानंतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात या उपोषणाची चर्चा सुरु झाल्याने शिक्षण विभागावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली होती. आणि दररोज नवनवीन घोटाळे व भ्रष्टाचार या जळगाव जिल्हा माध्यमिक विभागाचे उघडकीस येत आहेत, त्यानंतर आज उपशिक्षण अधिकारी श्री शेख साहेब व त्त्यांच्या टीमने उपोषण स्थळी किशोर अरुण सोनवणे यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य करत त्यांनी मागणी केलेल्या शाळांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

 

https://youtu.be/J3omWAT68-Y

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे