आपल खान्देशगुन्हेगारीब्रेकिंगसखी

टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न…!

धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेडखानी करत मारहाण केल्याचा आरोप मुलीने केला आहे. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला टवाळखोर शाळेत जाताना, शेतात जाताना पाठलाग करून वारंवार त्रास देत होते. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळ खोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची व बहिणीची छेडखानी करत बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडित मुलीसह तिच्या पित्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर केला आहे.

पालकमंत्र्यांसमोर सांगितली आपबिती… 

छेडछाडीच्या या प्रकरणात पोलिस आता काय कारवाई करतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन तिच्या प्रकृतीची चौकशी करून धीर दिला आहे. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर आपबीती कथन करत टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे