सत्यातील वास्तवाची जाणीव..
- सत्यातील वास्तवाची जाणीव..
काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते..
“वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते”
मॅसेज वाचला व मनात विचार आला हे खिळे जन्मतः वाकडे असतील का.? मग मी एका हार्डवेयर च्या दुकानात जाऊन १०० ग्राम, खिळे घेतले ते सगळेच सरळ होते., मी दुकानदारास विचारले भाऊ वाकडे खिळे नाहीत का.? त्याचे उत्तर “दादा कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडी चा चुकीचा दणका किंवा मग खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात” मग मी विचारले केला की मग ह्या वाकड्या खिळ्याचे करायचे काय? तर तो सहजतेने बोलला “साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा, जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल”.
परंतू तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता व त्याला खुशाल मोकळे सोडता (फेकुन देता)बर फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो तर चालती गाडी पंचर करणे चालत्याच्या पायास रुतून जखम करणे असे उपदव्याप करतो त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले, आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात, म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली.
दृष्टीकोन बदलला आणि, वास्तवाची जाणीव आली..



