पाचोरा भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट..
झूम मराठी ऑनलाईन | दिलीप परदेशी
पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवारी जळगावच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा प्रवेश करणार हे निश्चित झाले असून ते लवकरच मुंबईत समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पाचोरा मतदारसंघातील शरद पवार यांचे एकेकाळचे खंदे समर्थक आणि सध्या राष्ट्रवादीत (अजित पवार) स्थिरावलेले माजी आमदार दिलीप वाघ यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावमध्ये भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. ते लवकरच मुंबईत समर्थकांसह प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. माजी आमदार वाघ यांनीही या विधानसभेच्या निवडणुकीत पाचोऱ्यात शिवसेनेचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.



